साकूर गाव हे संगमनेर तालुक्यात झपाट्याने विकास साधणारे गाव. या गावात केलेली गुंतवणूक नफा देऊन जाते. त्यामुळे व्यापारी वर्ग साकूर येथे व्यवसायासाठी आकर्षित होत आहे. परिणामी साकूर गावाकडे बाहेरील व्यापाऱ्यांचा ओघ वाढला आहे. साकूर गावात जमिनीचे बाजार गगनाला भिडले आहेत. याचाच फायदा उठवत गावच्या बाहेरील दलालानी साकूर गावासह परिसरात शेतकऱ्याच्या भोळ्या भाबड्या स्वभावाचा फायदा घेऊन जमिनीची कवडीमोल किमतीत खरेदी केल्या. व हेच दलाल आज या शेतीचे तुकडा खरेदी बंदी असताना देखील व्यवाहर केले. आज मात्र देणारा व घेणारा यांना अडचणीत आणून तसेच जमिनीवर लेटिगेशन टाकून हे लोक मात्र उजळ माथ्याने फिरत आहेत.
कृषक जमिनीला शेतकऱ्यांकडून कवडी मोल भावात घेऊन या जमिनीवर सर्रास पणे नोटरी वर गुंठावार खरेदी केल्याचे प्रकार साकूर गावासह परिसरात सुरु आहेत. यावर महसूल ने प्रतिबंध घालणे गरजेचे आहे. परंतु महसूलच्या निष्क्रियेतेमुळे अश्या गुंठावार मालक इतर हक्कात टाकले जातात. कधी कधी या खरेदीदाराची फसवणूक झाल्याचे देखील उदाहरणं समोर आले आहे. नोंदणी निबंधक कार्यालय देखील खरेदी देताना कुठलीही पुर्वसूचना न देता खरेदी खत करून घेतात. नियमानुसार कुठलीही खरेदी करताना अगोदर जाहीर नोटीस देणं बंधनकारक असते पण हा नियम धाब्यावर बसवून सर्रास खरेदीखते केली जातात. म्हणजेच संबंधित अधिकारी नियमबाह्य खरेदीखते करून देतात हे समोर आले आहे.
खरेदीखते झाल्यानंतर उताऱ्यावर संबंधित खरेदीदाराची नोंदणी केली जाते. ही नोंदणी करत असताना गाव पातळीवर तलाठी किंवा मंडल अधिकारी यांनी संपूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे किंवा सदर प्रकरणात चावडीवर नोटीस बजावणी करणे गरजेचे आहे त्यानंतर नाव नोंदणी केली गेली पाहिजे पण तसं न होता मंडलाधिकारी किंवा तलाठी हे संबंधित उताऱ्यावर असलेल्या लोकांची नोटीस बजावत उताऱ्यावर नाव नोंदणी करतात. यामुळे नोटरी वर केलेला करार हा मात्र करार केलेल्या व्यक्तीची फसवणूक होताना दिसते.
निबंधक कार्यालयात या दलालांची सतत वर्दळ असल्याने अधिकारी लोकांशी यांचे हितसंबंध चांगलेच वाढले आहेत. महसूल च्या निष्क्रियेतेमुळे या लोकांवर अंकुश ठेवला जात नाही. साकूर येथे बाहेरून आलेले एजंट हे मोठ्या प्रमाणात माया जमून मिस्टर इंडिया झाले आहेत. त्यामुळे महसूल विभागाने व निबंधक कार्यालयाने या एजंटांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

साकूर गावात मांडवे रोड जवळील एक वादग्रस्त प्लॉट आहे. एकूण 20 गुंठे असलेला हा प्लॉट कुठलाही प्रकारे अकृषक नाही तरी ही या जमिनीवर अनेकदा साकूर गावची शांतता भंग करण्याचे काम झाले आहे. याच शेतजमिनीची मुळं मालकापासून खरेदी झाल्यानंतर किती वेळा खरेदी झाली हे सुद्धा नवलच आहे. आज या शेती प्लॉट वर प्लॉटिंग करून जोमात विक्री सुरु आहे. अनेकांकडून नोटरी वर लाखों रुपयाचा व्यवहार करून एजंट लोकांनी वर हात केले आहे. पैसे माघारी द्या अशी मागणी करायला गेल्यानंतर काही एजंटांकडून ॲट्रॉसिटी सारखे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे असेआर्थिक शोषण झालेल्या पीडित इसमानी आमच्याकडे न्यायाची मागणी केली आहे.
एकंदरीत वर्ग दोन असलेल्या अनेक जमिनीची खरेदीची परवानगी कशी दिली गेली याची चौकशी होणं सुद्धा गरजेचे आहे. कुठलीही जमिनीची खरेदी पूर्व नोटीस न देता जुना व्यवहार लपवून ठेऊन खरेदी होत आहेत. थेट उताऱ्यावर नाव आल्यानंतर संबंधित इसम हा जागा होतो आणि हे कसे झाले याची चौकशी सुरू करतो. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. दलाल देखील कानाला खडा लावतो, त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी या बातमीची दखल घेऊन कुठल्याही प्रकारची सात बारा उताऱ्यावर नोंदणी करताना नोटीस चावडीवर ठेवणे गरजेचे आहे.
