शासकीय विश्रामगृहारील बैठकीत दिले अधिकाऱ्यांना निर्देश
संगमनेर प्रतिनिधी: संगमनेर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित असणारी सर्व कामे तात्काळसुरू करावीत. कामे दर्जेदार होतात की नाही यावर अधिकार्यांनी लक्ष ठेवावे. निकृष्ट दर्जाचे काम झाले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.असे स्पष्ट निर्देश शासकीय विश्रामगृहावर आयोजित आढावा बैठकी मध्ये आमदार अमोल खताळ यांनी सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहावर सार्वजनिक बांधकाम विभाग, जि प सा. बां उपविभाग, प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजना या विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये प्रलंबित असणाऱ्या कामांचा आढावा घेण्यात आला. काही ठिकाणी कामे सुरू आहे. परंतु ती दर्जेदार होत नसल्याबाबतच्या नागरिकांच्या तक्रारी आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. शासन या कामा साठी लाखो रुपयांचा निधी देत आहे. त्यामुळे अधिकार्यांनी या विकास कामांमध्ये लक्ष घालून सर्व कामे दर्जेदार करावीत असे निर्देश आ अमोल खताळ यांनी अधिकाऱ्यांना दिले.

संगमनेर तालुक्यात गेली ४० वर्षापासून अनेक विकास कामे जाणूनबजूनप्रलंबित ठेवत आपली फसवणूक केली आहे. हे नागरिकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे जनतेने त्यांना घरी बसविले आहे. आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला या तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे आहे. सर्व विकासकामे सुरू करावीत. ठेकेदार करत असलेल्या विकास कामांवरती बारीक लक्ष ठेवावे. जे ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करतील त्यांच्याकडून दर्जेदार कामे करून घ्यावी या मतदारसंघातील एकही काम अपुरे राहणार नाही याची सर्वच अधिकार्यांनी काळजी घ्यावी असे निर्देश आ. अमोल खताळ यांनी अधिकार्याना दिले.
साकूर पठार भागात देखील रस्त्यांचे कामे सुरु आहेत तर काही पूर्णतःवास गेले आहे. ही कामे देखील अतिशय निकृष्ट दर्ज्याचे झाले आहेत. या कामांची देखील चौकशी करावी अशी मागणी पठार भागातून होत आहे.
