नाभिक समाजाचे शासन दरबारी प्रश्न मांडणार : सयाजीराव झुंजार
नाशिक प्रतिनिधी: महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष सयाजीराव झुंजार आणि माजी प्रदेशाध्यक्ष तथा समाजाचे जेष्ठ नेते दत्ताशेठ अनारसे यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सर्व समाज पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत नाभिक बांधवांच्या अडचणी समजून घेतल्या. झुंजार हे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर हा त्यांचा पहिलाच दौरा. त्यामुळे नाशिक मधील समाज बांधवांमध्ये उत्साह होता. दिनांक 6 फेब्रुवारी रोजी नाशिक रोड येथे सकाळी 9 वाजता पदाधिकाऱ्यांशी सयाजीराव झुंजार यांनी संवाद साधला. त्यानंतर सकाळी 11 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सिडको या ठिकाणी कार्यकर्ते व पदाधिकारी संवाद साधला, मेळाव्यास उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
यावेळी स्वर्गीय हनुमंतराव तात्या साळुंखे व स्वर्गीय कर्पुरी ठाकूर (बिहारचे मा.मुख्यमंत्री) यांनी 1981 साली कोल्हापूर येथे स्थापन केलेल्या महाराष्ट्र नाभिक महामंडळाबद्दल झुंजार यांनी सविस्तर माहिती दिली. ही मातृ संघटना असून तळागाळातील सर्व सामान्य नाभिक समाज व सुस्थितीतील नाभिक समाज यामधील दुवा म्हणजे महाराष्ट्र नाभिक महामंडळ आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवणे ही मुख्यत्वे महामंडळाचे कार्य असून मी मला मिळालेल्या संधीचं सोनं समाजासाठी नक्कीच करेन असे आश्वासन यावेळी नूतन प्रदेशाध्यक्ष झुंजार यांनी दिले.

तदनंतर चांदोरी येथील श्री संत सेना महाराज मंदिरास भेट देऊन पुढे कसबे सुकेने येथील सूरू असलेल्या श्री संत सेना महाराज विठ्ठल रुक्मिणी मंदिरास भेट देऊन कार्यकर्त्यांची संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संघटन या विषयावर मार्गदर्शन करून सर्वांनी एकत्र काम करावे व महामंडळाशी एकनिष्ठ राहण्याचा सल्ला यावेळी दिला. झुंजार व अनारसे व सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांचे निफाड तालुका नाभिक समाजाच्या वतीने तालुकाध्यक्ष डॉ प्रकाश वाघ व प्रमोद सोनवणे उपाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांच्या आतिशबाजीत स्वागत केले. त्यानंतर निफाड फाउंडेशनच्या वतीने सुरु असलेल्या श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज व श्री संत सेना महाराज विठ्ठल रुक्मिणी मंदिरास झुंजार यांनी भेट देऊन बांधकामाची पाहणी केली यावेळी संत सेना फाउंडेशनचे अध्यक्ष शरद वाघ व सर्व विश्वस्तांनी नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष सयाजी झुंजार व दत्ताशेठ अनारसे यांचा सत्कार करून फाउंडेशन बद्दल माहिती दिली.
यावेळी झुंजार यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत संत सेना फाउंडेशनला शुभेच्छा दिल्या त्यानंतर नांदूर मधमेश्वर येथे सुरू असलेल्या श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज व श्री संत शिरोमणी सेना महाराज विठ्ठल रुक्मिणी मंदिरास सदिच्छा भेट देऊन बांधकामाची पाहणी केली. नांदूर मध्यमेश्वर येथील अनारसे परिवाराच्या वतीने सर्वांचा सत्कार करण्यात आला समाजामध्ये असलेल्या प्रलंबित प्रश्नाबाबत मला माहिती द्यावी मी निश्चितच प्रदेशाध्यक्ष या नात्याने समाजाच्या हितासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन यावेळी झुंजार यांनी दिले.
म्हाळसाकोरे येथील सुरू असलेल्या श्री संत सेना महाराज मंदिर भेट देऊन मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णू कणसे यांनी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला सुरेशजी पीडीयार, पत्रकार निलेशजी देसाई यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांचा पुष्पहार व शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. त्यानंतर श्री संत सेना चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी श्री संत सेना महाराज व श्रीमद् भगवद्गीता मंदिरात कार्यकर्ता परिसंवाद मेळाव्यास उपस्थित राहिले. यावेळी श्री संत सेना चॅरिटेबल ट्रस्ट मंदिर समिती व समस्त नाभिक समाज लासलगावचे वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडला.या कार्यक्रमात सयाजी झुंजार यांनी पदाधिकारी व सर्व समाज बांधवांना संबोधित केले यावेळी त्यांनी समाज संघटने विषयी व महामंडळाविषयी अतिशय तळमळीने माहिती देऊन लासलगाव नाभिक समाजाचे कौतुक केले.

आपल्या मनोगतात त्यांनी मी 1988 पासून पारंपारिक गावकी पासून ते युनी सेक्स सलून पर्यंतचा प्रवासाचे वर्णन केले. आपले व्यवसायात आधुनिकता आणण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. आत्ताच्या स्पर्धेच्या युगात पारंपारिक व्यवसाय न ठेवता तो मल्टिप्लेक्स सलून च्या रूपात आणावा असा सल्ला सर्व कार्यकर्त्यांना दिला आपला व्यवसाय व आपली कला करत असताना आपण आपल्या व्यवसायाला व स्वतःला सिद्ध केले पाहिजे तरच आपण या व्यवसायात प्रगती करू शकतो असाही अनमोल सल्ला त्यांनी सर्व समाज बांधव आणि पार्लर व्यवसाय करणाऱ्या तरुण तरुणीना दिला. कार्यक्रमानंतर महाआरतीने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
यावेळी देवीदास ठाकरे यांच्या सह महामंडळाचे नेते दिलीप अनार्थे, विष्णू वखरे, मंगेश माळी, कैलास आंबुसकर हे वरिष्ठ नेते देखील उपस्थित होते.
तीन दिवसीय उत्तर महाराष्ट्र दौरा अतिशय यशस्वी पार पडला. हा दौरा यशस्वी करण्यामध्ये महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष संजयजी गायकवाड, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख अरुणजी सैंदाणे, महामंडळाचे नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारणी सदस्य राजीव (नंदू भाऊ) जाधव, अरविंद देसाई , नारायणरावजी यादव , अशोक आप्पा सूर्यवंशी, नाशिक जिल्हा महिला अध्यक्ष सीमाताई राऊत, महिला शहर प्रमुख पल्लवी ताई मगर, तसेच सर्व महिला भगिनी नाशिक जिल्हा युवासेना अध्यक्ष रोशन भाऊ शिंदे, नाशिक जिल्हा अध्यक्ष सुरेशजी सूर्यवंशी, दिंडोरी लोकसभा अध्यक्ष अनिलजी वाघ, ग्रामीण- जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय वाघ, जिल्हा कार्याध्यक्ष गणेशजी बिडवई, सरचिटणीस सचिन सोनवणे ,जिल्हा व तालुका सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
सयाजीराव झुंजार साहेब यांच्या या कार्याला नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम जनता कौतुक करत आहे.

