दहशत्व दादागिरी करणाऱ्याचे नाव जाहीर करा: शिवसेनेचे शहर प्रमुख दिनेश फटांगरे यांचे सोशल माध्यमातून पोस्ट व्हायरल करणाऱ्यांना खुले आव्हान
संगमनेर प्रतिनिधी: ज्यांनी कुणी तुम्हाला दहशत व दादागिरी करण्याची भाषा केली आहे त्यांचे नाव जाहीर करा.. आणि रीतसर त्याच्या विरोधात शहर पोलिसात तक्रार द्या. त्याच्यावरील कार्यवाही करण्यासाठी महायुती पुढाकार घेईन असे खुले आव्हान शिवसेनेचे शहरप्रमुख दिनेश फटांगरे यांनी सोशल माध्यमातून पोस्ट व्हायरल करणाऱ्यांना दिले आहे.
संगमनेर तालुक्यात परिवर्तन झाल्या नंतर प्रथम आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या वतीने बस स्थानकावर अखंड हिंदुस्तानचे दैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव साजरा होत आहे. या उत्सवामध्ये महायुतीसह सर्व हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. मात्र काही जणांनी सोशल माध्यमातून आमच्यावरती दहशत आणि दादागिरी केली जात असल्याचा संदेश व्हायरल केला आहे. ज्यांनी कुणी दहशत व दादागिरी तुमच्यावर केली आहे, त्यांचे नाव जाहीर करा. संपूर्ण राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार हे कार्यक्षमपणे करत आहे. तुमच्यावर ज्यांनी कोणी दादागिरी व दहशतीची भाषा केली त्यांची रीतसर पोलिसात तक्रार करा, आमदार अमोल खताळ हे पोलीस अधिकाऱ्यांना सांगून कारवाई करण्यास सांगतील.
स्वतः आ अमोल खताळ यांनी बस स्थानकावर येऊन सर्वांशी चर्चा केली. मात्र बैठकी नंतर अचानक काही जणांनी विनाकारण सोशल माध्यमातून असे संदेश व्हायरल करून त्यांनी नेमके काय साध्य केले आहे. परंतु या शहर आणि तालुक्यातील माय-बाप जनता आणि शिवप्रेमी सुज्ञ आहे, या उत्साहामध्ये शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील यात कुठलीही शंका बाळगण्याचे कारण नाही. परंतु विनाकारण राजकारण करण्यासाठी काही जणांनी अशा स्वरूपाच्या पोस्ट सोशल माध्यमातून व्हायरल करण्या ऐवजी बस स्थानक परिसरात होणाऱ्या शिवजयंती उत्सवात सहभागी व्हावे, आणि या सर्व चर्चांना पूर्णविराम द्यावा अशी कळकळीची विनंती शहर प्रमुख दिनेश फटांगरे यांनी केले आहे.
