प्रतिनिधी युन्नूस शेख
म्हैसगाव येथे 12 वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुभाष बन्सी काकडे हे होते. तर प्रास्ताविक प्रा.माने सर यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून राहुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे साहेब हे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना सोशल मिडिया चा चुकीच्या वापराचे दुष्परिणाम किती भयंकर आहेत हे सांगितले. ठेंगे साहेब यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की आपण स्वतः रोजगार मिळवण्यासाठी ध्येय उंच ठेवले पाहिजे. तसेच चांगला सुसंस्कृत नागरिक बना असे बहुमोल मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती राहुरी चे गट शिक्षणाधिकारी मोहिनीराज तुंबारे साहेब हे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन आपण आपले भविष्य उज्वल करावे व आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे, कनिष्ठ महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवावा. विविध गुणदर्शन स्पर्धा व स्पर्धा परीक्षा यांचे महत्त्व लक्षात घेऊन स्वतःला घडवा असा बहुमोल कानमंत्र विध्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाचे व्याख्याते प्रा.अमोल जाधव यांनी आपल्या मधुर वाणीतून विद्यार्थ्यांना गायनातून व अनमोल विचारांतून जीवनाचा सारांश सांगितला. सोशल मिडिया चा वाढता वापर,आई वडील यांच्याशी संपत चाललेला संवाद यावर विद्यार्थ्यांनशी संवाद साधला. या कार्यक्रमाप्रसंगी सुत्रसंचलन इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यीनी कु.झावरे तनुजा व शेख शबनम यांनी केले, तसेच या कार्यक्रमाप्रसंगी उल्लेखनीय कामगिरी बद्दल बेस्ट टिचर अवार्ड- 2025 उपस्थितांच्या वतीने प्रा. रोकडे, के.बी,प्रा.गाडे, एम.बी व विद्यार्थी अवार्ड- 2025 कु.तनुजा विजय झावरे, कु.शबनम यूनुस शेख, कु.श्रद्धा पोपट माने यांना देण्यात आला.

याप्रसंगी उपस्थित पत्रकार,पालक सर्व विद्यार्थ्यी व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.दिघे सर,प्रा.काकडे सर,प्रा.गागरे सर प्रा,तांबे सर प्रा.खळदकर सर प्रा.नलगे मॅडम,प्रा.बुळे मॅडम, उपस्थित होते.
