आश्वी, दि.१० प्रतिनिधी
महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोठा लाभ महिलांना मिळाला आहे. सरकारने महिलांकरीता मोठ्या प्रमाणात योजना सुरु करुन, विकासाची संधी निर्माण करुन दिली आहे. यासर्व योजनांचा लाभ महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलेला पुढाकार महत्वपूर्ण असलयामुळेच सर्व महिला मतदार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतील असा विश्वास भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा कांचन मांढरे यांनी व्यक्त केला.
या संदर्भात बोलताना सौ.मांढरे म्हणाल्या की, राज्यात महायुती सरकार आल्यानंतर प्रथमच राज्यातील महिलांकरीता अनेक योजना जाहीर केल्या. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्वांधिक महिलांनी घेतला आहे. जिल्ह्यातील ११ लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलेला पुढाकार महत्वपूर्ण असून, त्यांनी महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी विशेष यंत्रणा उभारून केलेल्या सहकार्यामुळेच या योजनेत सर्वाधिक महिला सहभागी होवू शकल्या.
बस प्रवासात पन्नास टक्के सुट, विद्यार्थींनींना व्यवसायीक शिक्षण मोफत, लखपती दिदि योजना अशा अनेक योजनांमधून महिलांना विकासाच्या संधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मिळू शकले आहेत. स्थानिक पातळीवर जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून महिला बचत गटांनाही प्रोत्साहन देण्यासाठी सौ.शालिनीताई विखे पाटील यांचाही पुढाकार असतो.
या बचत गटांच्या चळवळीमुळे महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळाल्या असून, बचत गटांनी उत्पादीत केलेला माल आता मोठ्या शहरामंधील मॉलमध्येही विक्रीसाठी जावू लागल्याने महिलांनी मोठे प्रोत्साहन मिळाले आहे. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व महिला या महायुती सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतील असा विश्वास सौ.कांचन मांढरे यांनी व्यक्त केला आहे.