संपादकीय /सहदेव जाधव
राहूरी विधानसभा मतदारसंघात भाजप नेते शिवाजी कर्डीले यांचा मोठा विजय झाला. शिवाजी कर्डीले यांचा 2019 मध्ये प्राजक्त तनपुरे यांनी पराभव केला होता. पण याचा वचपा 2024 च्या निवडणुकीत शिवाजी कर्डीले यांनी व्याजासकट काढला. अहिल्यानगर जिल्ह्यात हा तालुका लोकसभेच्या दक्षिण नगर मतदार संघात येतो. येथून फेक नेरेटिव्ह तयार करून प्राजक्त तनपुरे यांनी निलेश लंके यांच्या सोबतीने सुजय विखे यांना पराभूत करण्यासाठी जीवाचे रान केले होते. याचाच बदला सुजय विखे यांनी येथे घेतला.
प्राजक्त तनपुरे हे उद्धव ठाकरे सरकार मध्ये ऊर्जा मंत्री होते. परंतु मंत्री असून देखील राहुरीसाठी त्यांना पाहिजे तसा विकास करता आला नाही. जी रस्त्यांची कामे झाली ती कामे देखील पूर्णतःवास नेता आली नाही. जी कामे केली ती दर्जेदार झाली नाही त्यामुळे विकास काय आहे हे या तालुक्याने बघितले नाही. परिणामी प्राजक्त तनपुरे यांना पराभवाचा सामना करावा लागला. धनगर नेते आण्णासाहेब बाचकर यांना फोनवर प्रसाद तनपुरे यांनी दिलेली धमकी संपूर्ण जिल्ह्याने बघितली. काहीअंशी याचा फटका देखील प्राजक्त तनपुरेना बसला.
तनपुरे परिवाराची गेल्या काही वर्षात दहशत वाढली होती. बिल्डर लॉबी वाढली होती. एका निर्भीड पत्रकाराचा खून हे देखील याच दहशतीचे उदाहरण समजले जात होते. तालुक्यात वाढलेली गुन्हेगारी देखील तनपुरेच्या पराभवा मागच कारण आहेत. राहूरी परिसरात अनेक ढाबे व लॉजिंग वर चाललेले अवैध धंदे यांच्या वर लोकप्रतिनिधी म्हणून अंकुश ठेवला नाही. काही हॉटेल वर सर्रास वेश्या व्यवसाय केला जात आहेत. ग्रामीण भागात नगर मनमाड रोड लगत वाढलेले परप्रांतीय मुलींचे लोंढे यामुळे येश्या व्यवसायाला राजश्रय मिळत गेला. लोकप्रतिनिधी म्हणून तनपुरे यांनी याकडे लक्ष्य देणे गरजेचे होते कारण यातून सोशल लाईफ वर परिणाम होत होता. स्थानिक रहिवासी या धंद्याना बेजार झाले होते. ही कारणे देखील मतदारांनी विचारात घेतली.
शिवाजी कर्डीले यांनी हिंदुत्वाची घेतलेली भूमिका त्यांच्यासाठी फायदेशीर ठरली. त्यामुळे हिंदूंची मते घेऊन शिवाजी कर्डीले प्रचंड मतांनी विजयी झाले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलेल्या सभेमधून अहंकारी वक्तव्य मतदारांना भावले नाही. विखे पिता पुत्रांवर खालच्या भाषेत जाऊन केलेली टीका मतदारांना जिव्हारी लागली. खा. निलेश लंके व बाळासाहेब थोरात यांचे अहंकारी भाषण राहुरीकरांनी नाकारली. आणि शिवाजी कर्डीले यांना प्रचंड मतांनी विधानसभेत पाठवले.