संगमनेर प्रतिनिधी: शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे सलग आठव्यांदा आमदार झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रीपदावर वर्णी लागली आहे. त्यामुळे संगमनेरात महायुती च्या कार्यकर्त्यांच्या वतीने एकमेकाला मिठाई भरऊन, फटाके फोडत, जल्लोष साजरा करण्यात आला.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरच्या राजभवन परिसरात पार पडला. अहिल्यानगर जिल्ह्यातून राधाकृष्ण विखे पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्याचे वृत्त संगमनेर शहरात येऊन धडकताच त्यांच्या जनसेवा संपर्क कार्यालयाच्या समोर तसेच संगमनेर बस स्थानकावरती महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकाला मिठाई भरवत तोंड गोड केले. तसेच फटाक्याची आतिषबाजी करत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जय जयकाराच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
यावेळी भाजपचे जेष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ, शिवसेनेचे शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार, डॉ सोमनाथ कानवडे, राहुल खताळ, रोहिदास साबळे, भारत गवळी, दिलीप रावल, वाल्मीक शिंदे, राजेंद्र सांगळे, शशांक नामन, संदेश देशमुख, सुयोग गुंजाळ, रोहिदास गुंजाळ, अक्षय वर्पे, अमित राठी, शुभम लाहामगे, रणजीत जाधव, महेश जगताप, सुयोग जोंधळे, महेश हांडे, रणजीत गायकवाड, अनिकेत चांगले, पवन कानकाटे, अजिंक्य उपासनी, बापू रणधीर, ओंकार राऊत, सागर पावसे, नाना परबत, विजय श्रीखंडे, भगवान शिंदे, पप्पू गुंजाळ, अरुण जेडगुले यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते