भुम परांडा व बार्शी तालुक्याती ४o गावातील महीला पुरुषानी केले श्रमदान श्रमदान
भूम प्रतिनिधी : तालुक्यातील भवानवाडी येथे वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट(वॉटर) चे संस्थापकीय चेअरमन फादर बाखर (बाबा) यांच्या 100 व्या जयंती निमित्त टेंभी आई मंदिरावरील परिसरात स्वच्छता तसेच डोंगरावर लावलेल्या झाडांना पाणी जिरवण्यासाठी वाफे व आच्छादन करण्यात आले.
फादर बाखर (बाबा) यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त, सुमारे 247 उत्साही सहभागी यांनी फादर बाखर (बाबा) यांच्या वारशाचा एक अर्थपूर्ण उपक्रमाद्वारे सन्मान करण्यासाठी एकत्र आले. हा कार्यक्रम पर्यावरण संवर्धनावर केंद्रित होता, ज्यामध्ये फादर बाखर (बाबा) यांची समुदाय सेवा आणि पर्यावरनवरील कार्यप्रणालीची वचनबद्धता होती.
सहभागी श्रमदान कर्त्यांकडून सुमारे 3500 झाडांचे आच्छादन, मंदिर परिसरात स्वच्छता तसेच डोंगरावर लावलेल्या झाडांना पाणी जिरवण्यासाठी वाफे करण्यात आले. हा उपक्रम केवळ झाडांच्या आरोग्यासाठी आणि वाढीस हातभार लावणार नाही तर उपस्थितांमध्ये एकजुटीची भावना देखील वाढविण्यास मदत करणारा होता. स्वयंसेवक, पुरुष आणि स्त्रिया, दोघांनीही एकत्रित पणे काम केले.
या स्वच्छता उपक्रमामध्ये अनेक कुटुंब आणि स्थानिक रहिवाशी यांनी वैविध्यपूर्ण गट तयार करून श्रमदान केले व फादर बाखर (बाबा) यांच्या सेवा आणि पर्यावरना प्रती असलेल्या मूल्यांनी प्रेरित झाले.
या कार्यक्रमात श्री. कांतीलाल गिते प्रकल्प व्यवस्थापक व श्रीमती.समीना पठाण समाजिक विकास अधिकारी (वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (वॉटर) भूम) यांनी फादर बाखर (बाबा) यांचे जीवन आणि योगदान व तसेच जलसंधारण, समाजसेवा आणि पर्यावरणाबाबतची त्यांची बांधिलकी अनेकांना कश्या प्रकारे प्रेरणा देत आहे यावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (वॉटर) भूम चे कर्मचारी श्री. विजय पाटील,सोमनाथ गुळदगड,शाहनवाझ शेख, संदिप वाघमारे व परिसरातील महिला व पुरुष पुढारी यांनी परिश्रम घेतले. प्रकल्पातील ग्रामविकास समीती अध्यक्ष, सदस्य , विषमुक्त भाजीपाला करणारे शेतकरी महीला, शेतकरी उत्पादक कंपनी संचालक , वसुंधरा सेवक ,सेविका , परिवर्तक भागीदार, भवानवाडी, बावी ग्रामस्थ तसेच परिसरातील वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (वॉटर) प्रकल्पातील अनेक गावांनी यात मोठ्या उत्साहाने सहभाग दर्शवला.