अकोले ( प्रतिनिधी ) भारतीय जनता पार्टी उत्तर नगर जिल्हा सरचिटणीसपदी अकोले चे तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे यांची निवड करण्यात आली आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी जिल्हा कार्यकारणी घोषित केली. यात जिल्हाध्यक्ष पदानंतरचे महत्त्वाचे पदावर श्री भांगरे यांची निवड करण्यात आली. भांगरे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक असून अकोले तालुक्यात भारतीय जनता पार्टीची स्थापना त्यांनी केली आहे.
भाजपा तालुका अध्यक्ष, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष, भाजप युवा प्रदेश कार्यकारणी सदस्य, भाजप प्रदेश परिषद सदस्य अशा अनेक पदांवर त्यांनी काम केले असून गेले नऊ वर्षापासून ते भाजपचे तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के निकाल निकाल लागला होता.
वृद्ध साहित्य कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. अकोले तालुक्यामध्ये राम मंदिर उभारणी साठी आंदोलन केले असून योध्या मध्ये बाबरी मशीद पाडण्याच्या आंदोलनात सहभागी होते. भाजपचे नेते सूर्यभान पाटील वहाडणे ना.स.फरांदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जिल्ह्यात भाजपचे संघटन वाढविण्याचे काम केले आहे.
त्यांच्या निवडीचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री मधुकरराव पिचड, प्रा.आ. राम शिंदे, स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, वैभवराव पिचड, राजेंद्र गोंदकर, नितिन दिनकर, जालिंदर वाकचौरे, नितीन कापसे, श्रीराज डेरे, सोनाली नाईकवाडी, भाऊसाहेब वाकचौरे, राहुल देशमुख, यशवंत आभाळे, रमेश राक्षे, मच्छिंद्र मंडलिक आदींनी अभिनंदन केले आहे.