दिवाळीत दूध उत्पादकांचे दिवाळ काढू नका.. ज्ञानेश्वर झाडगे पाटील
संगमनेर प्रतिनिधी: ऐन सणसुदीच्या दिवसात शेतकऱ्यांवर आणि दूध उत्पादकांवर उपासमारीची वेळ आली आहे दुष्काळाची परिस्थिती असतानाही शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजार भाव मिळत नाही. त्याचप्रमाणे शेतीवर आधारित असणाऱ्या दुग्ध व्यवसायासारख्या व्यवसायांनाही बरे दिवस सध्या दिसत नाहीत.
अपुऱ्या पाण्या पावसामुळे या दुष्काळाच्या दिवसात दिवाळी सण कसा साजरा करायचा याची शेतकऱ्यांपुढे चिंता आहे. त्या दिवसेंदिवस दुधाचे दर कमी होत आहेत आणि पशुखाद्य व इतर वस्तूंचे बाजार भाव वाढताना दिसून येत आहेत. दुधाचे बाजार भाव कमी झाल्यामुळे पशुखाद्य कसे खरेदी करायचे किंवा अपुऱ्या चाऱ्या अभावी पशुधन कसे वाचवायचे हा शेतकऱ्यांपुढे यक्षप्रश्न निर्माण झाले आहे.
शेतकरी आणि दूध उत्पादक यांच्या याच समस्या संदर्भात पिंपळे येथील सामाजिक कार्यकर्ते आणि यशस्वी दूध उत्पादक प्रगतशील शेतकरी श्री ज्ञानेश्वर झाडगे यांनी महसूल व दुग्धविकास मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन दिले आहे आणि लवकरात लवकर दूध उत्पादकांच्या समस्या सोडवण्याची विनंती केली आहे महसूल मंत्री ही यावर लवकरात लवकर तोडगा काढतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.