साकूर प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यातील साकूर येथे राहणारे वयोवृद्ध नागरिक किसन रामभाऊ पवार यांना त्यांच्याच शेजारी राहणाऱ्या दोन तरुण व एका महिलेने वृद्ध शेतकऱ्याची खोडी काढत लाथाबुक्क्यांनी मारहाण करत वृद्धास धमकावले आहे.
सविस्तर वृत्त असे की, संगमनेर तालुक्यातील साकूर येथे किसन रामभाऊ पवार हे आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. मुलगा देवदर्शनाला गेला असता त्यांच्याच शेजारी राहणाऱ्या तीन तरुणांनी अचानक वृद्ध शेतकऱ्याच्या शेतातील बांधावरील सुबाभूळ, आंबा, लिंब प्रजातीचे झाडे तोडण्यास सुरुवात केली. ही झाडे तोडू नका अशी विनंती वृद्ध शेतकरी करत असताना तीन तरुणांनी वृद्धास खाली ढकलून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत ही झाडे तोडली आहेत. तसेच यावेळी वृद्धास जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. असे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
सदर वृद्धाने मुलगा देवदर्शनाहून आल्यानंतर दिं ९/१/२०२४ रोजी ऑनलाईन प्रणालीद्वारे गुन्हा दाखल केला आहे. यांत आरोपी ओंकार कैलास पवार, शंकर कैलास पवार यांच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास घारगांव पोलीस करत आहे.