वसमत प्रतिनिधी (श्रीकांत बारहाते):वसमत तालुक्यातील हट्टा येथील सौ.शांतादेवी वेदप्रकाश पाटील होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय हट्टा येथे हिंगोली महामार्ग पोलिसाच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह मार्गदर्शन व समुपदेशन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ हिलाल ए एच प्रमुख पाहुणे म्हणून हट्टा पोलिस स्टेशनचे साहयक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे साहेब प्रमुख मार्गदर्शक श्री गजानन गिरी शैलेश मुदिराज पोले, डॉ हजारी, डॉ अग्रवाल, डॉ कदम मॅडम, डॉ कामरान, डॉ पुजा मॅडम, डॉ शेख, अरविंद गजभार, गडगिळे खतिब सांगळे तसेच या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, पोलिस कर्मचारी व पत्रकार बंधु हजर होते.
महामार्ग पोलिस रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त श्री गजानन गिरी साहेब यांनी हेल्मेट, सिट बेल्ट बदल माहिती सांगुन अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना नागरीकांनी न भिता मदत करावी यात पोलिसांची भिती बाळगु नये असे प्रतिपादन गिरी यांनी केले. वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन श्री गजानन बोराटे साहेब यांनी केले. या कार्यक्रमा निमित्त महामार्ग पोलिस मदत के़द्र जिल्हा हिंगोली यांच्या वतीने सर्व पत्रकार बंधुना पेन डायरी व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला अरविंद गजभार अरुण चव्हाण शेख शादीक वकियोदिन सिद्दिकी इरफान सिद्दिकी नागराज एंगडे संतोष शिंदे शाम रोकडे प्रल्हाद चव्हाण माणिक मलांडे श्रीकांत बारहाते बारबिंडे आदिची उपस्थिती होती तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सापतकर टि बी यांनी केले