महाराष्ट्र राज्याचे महसूल तथा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचा भुमीपूजन समारंभ
संगमनेर प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा उद्या झंझावती दौरा होणार आहे. यात संपूर्ण तालुक्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. काही दिवसांत लोकसभेचे बिगुल वाजणार आहे. निवडणूक आयोगाकडून कोणत्याही क्षणी आचारसंहिता घोषीत होऊ शकते, अशातच आता मंजुर झालेल्या विकास कामांचे उद्घाटन होत आहे.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे संगमनेर तालुक्यावर विशेष लक्ष आहे. त्यातच त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात प्रत्येक गावाला भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे. पठार भागातील देखील काही गावांमध्ये विखे पाटील यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात जवळा बाळेश्वर, रणखांब, खांबा या गावांचा समावेश आहे. संध्याकाळची सभा ही खांबे गावात होणार असून या ठिकाणी विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. यात प्रामुख्याने खांबे गावचे विद्यमान सरपंच रविंद्र दातीर यांचा भाजप प्रवेश होत आहे. त्यामुळे काॅंग्रेस ला विशेष करून आ बाळासाहेब थोरात यांना मोठा धक्का समजला जातो आहे.
काही दिवसांपूर्वी भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तु तू मै मै सुरू असून जुना नवा असा वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वी तालुकाध्यक्ष यांचा राजिनामा नाट्य तालुक्याने बघितले. याची दखल थेट प्रदेश कार्यालयाने घेतली होती. या दरम्यान मोठ्या प्रमाणात संगमनेर भाजपात दुफळी निर्माण झाली होती. या वादानंतर महसूलमंत्र्यांचा प्रथमच दौरा लागला असुन हा वाद मिटविण्याचे विखे पाटलांपुढे मोठं आवहान असणार आहे.