प्रा. कल्पना शेळके यांना लोकमत सखी मंचचा पुरस्कार
साकूर प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यातील साकूर येथील रमेश फिरोदिया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या प्रमुख प्रा. कल्पना सुभाष घुगरकर-शेळके यांना या वर्षीचा लोकमत सखी मंचतर्फे देण्यात येणारा शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
या पुरस्काराचे वितरण काॅंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या अर्धांगिनी कांचनताई थोरात यांच्या हस्ते संगमनेर येथे करण्यात आला. दरवर्षी महिला दिनाचे औचित्य साधून लोकमत सखीमंच संगमनेर हे वैद्यकीय क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, उद्योग क्षेत्र, सामाजिक सेवा क्षेत्र, विधी व न्याय क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, आदर्श माता अशा ८ क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करते. या वर्षीचा शिक्षण क्षेत्रातील महत्वाच्या योगदानाबद्दल लोकमत सखी मंचचा पुरस्कार प्रा. कल्पना शेळके-घुगरकर यांना देण्यात आला आहे.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर, थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील खेमनर यांच्यासह रमेश फिरोदिया महाविद्यालयाचे अध्यक्ष रमेशजी फिरोदिया, सर्व पदाधिकारी, प्राचार्य सचिन घोलप, उप प्राचार्य रणजित गिरी, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, आणि पालक यांनी प्रा. शेळके यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांचे सर्वच स्तरातून मोठं कौतुक करण्यात येत आहे.