वायरमन च्या मनमानी करभाराला कंटाळून शेतकऱ्यांचे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन
साकूर प्रतिनिधी: महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी पूर्णपणे वैतागले असून, हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी आज महावितरण कंपनीच्या साकूर येथील सब स्टेशनच्या कार्यालयात जाऊन निवेदन दिले आहे. साकूर सब स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या हिरेवाडी ते रणखांब या लाईनवरील लाईनमन आपली मनमानी करत आहे.
शेतकऱ्यांनी पाऊस पडल्यानंतर नवीन पीकांची लागवड केली आहे. टोमॅटो, फ्लाॅवर अशी पिकं घेतली आहे. वीजेच्या सततच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहे. लाइनवर काही बिघाड झाल्यास लाईनमन उपलब्ध होत नाही. दिवस रात्र लाईन बंद राहते. या लाईनमनची अरेरावी या शेतकऱ्यांना ऐकावी लागते. या लाईन अंतर्गत येणाऱ्या सर्व शेतकरी या लाईनमनच्या अरेरावी ला व मनमानीला वैतागले असून या लाईनमनवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता यांना केली आहे. अन्यथा आम्ही सर्व शेतकरी आपल्या दालनात धरणं आंदोलन धरणार आहोत असा इशारा देखील देण्यात आला आहे.
या निवेदनावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेना तालुका प्रमुख योगेश पाटील खेमनर, बंडू बाळासाहेब खेमनर, सुभाष खेमनर, दिपक हजारे, डॉ. सुनिल खेमनर, शिवाजी खेमनर, कैलास इघे, अर्जुन भगत, नाना भडांगे, वैभव भगत, रयत क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष भिवा सोन्नर, लक्ष्मण सोन्नर आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.