संगमनेर प्रतिनिधी: अहमदनगर जिल्ह्यातील सुपुत्र काही काळ महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राहिलेले डॉ. नितिनजी किरीर साहेब (भा.प्र.से.) यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा, तसेच अकोले तालुक्यातील सुपुत्र विजयजी चौधरी आणि अजितजी देशमुख यांची सहसचिव पदी पदोन्नती झाल्याबद्दल नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दिनांक ३ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता करण्यात आले आहे.अकोले तालुक्याच्या वतीने या तीनही कर्तृत्ववान अधिकाऱ्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड साहेब आहेत. आ. डॉ. किरण लहामटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, आ.सत्यजीत तांबे, सिताराम पाटील गायकर, विकासराव देशमुख (भा. प्र. से.) निर्मलकुमार देशमुख (भा. प्र. से.) सतिषजी देशमुख (भा. प्र. से.) शेतकरी नेते दशरथ सावंत, मधुकर नवले, सुरेशराव कोते, आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे ठिकाण मातोश्री लाॅन्स, इंदोरी फाटा, ता. अकोले, जि. अहमदनगर आहे. तरी या कार्यक्रमासाठी व आपल्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे कौतुक करण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती अशोक एकनाथ वाकचौरे व दौलत एकनाथ वाकचौरे यांनी केले आहे.