अकोले तालुक्यातील कळस बू येथे गणेश उत्सवात ऋषिपंचमी ते वामन जयंती या गणेश उत्सव पावन पर्व
कळस ( प्रतिनिधी ) सदेह वैकुंठाला जाणारे एकमेव व्यक्तिमत्व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आहेत म्हणून ते जगावेगळे आहेत. असे मत ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील यांनी सहावे कीर्तन पुष्प गुंफताना व्यक्त केले.
काम नाही काम नाही,
जालो पाही रिकामा ||१||
या जगदगुरु तुकाराम महाराज यांचे अभंगावर निरूपण करताना पाटील महाराज अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या प.पू. सुभाष पुरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अकोले तालुक्यातील कळस बू येथे गणेश उत्सवात ऋषिपंचमी ते वामन जयंती या गणेश उत्सव पावन पर्व काळात आयोजित अखंड हरिनाम सप्ताह तथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मध्ये बोलते होते.
यावेळी अगस्ती साखर कारखाना चे संचालक कैलासराव वाकचौरे व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री. ईश्वर वाकचौरे यांचा संतपंगत दिले बद्दल सरपंच राजेंद्र गवांदे यांच्या वतीने आम्रवृक्ष देऊन सन्मान करण्यात आला.
श्री. पाटील महाराज म्हणाले की, ज्ञानेश्वरी वाचून बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशउत्सव सुरु केला अन ते लोकमान्य झाले. नामात रंगलेला साधक पाहिजे, कळस कळसाला कसा दिसतो, जे जे नवीन असेल ते सर्व ज्ञानेश्वरी आले. आहार, निद्रा, भय, मैथुन ही मानवाची गरज आहे. संत, अध्यात्मिक व्यक्ती निर्भय असतात. भजन जीवनात मिठा सारख असाव.असे अनेक प्रमाण, अभंग व दाखले देत भाविकांना मंत्रमुग्ध केल.
यावेळी ह.भ.प. दिपक महाराज देशमुख यांनी प्रवचन सेवा झाली. अगस्ती पायी दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष राजेंद्र महाराज नवले, ह.भ.प. गणेश महाराज वाकचौरे, मृदंगाचार्य संकेत महाराज आरोटे, गायकवृंद अरुण महाराज शिर्के, किरण महाराज शेटे, रविदास महाराज जगदाळे, प्रवीण महाराज पांडे, हार्मोनियम वादक डॉ. विकास वाकचौरे, विणेकरी गंगा बाबा वाकचौरे हे उपस्थित होते.