श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील महादेववाडी शिवारात एका व्यक्तीचा अर्धवट जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. या बाबतची माहिती लोणी व्यंकनाथ गावचे पोलिस पाटील मनेश जगताप यांनी श्रीगोंदा पोलिसांना देत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली.या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणी व्यंकनाथ येथील महादेववाडी रोडवर पुलाजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात एका व्यक्तीचा अर्धवट जळलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याचे शिवाजीराव जाधव यांनी पोलिस पाटील मनेश जगताप यांना दिली.त्यांनी या बाबतची माहिती पोलिस ठाण्यात देताच घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी धाव घेत पाहणी केली. ही घटना घातपातातून झाली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. टाकून या व्यक्तीला मारण्यात आले असावे, असेही पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस उपनिरीक्षक संपत कन्हेरे यांना पुढील तपासाबाबत सूचना करत पंचनामा करण्याच्या सूचना देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.