साईबाबा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था बिरेवाडी या पतसंस्थेत 2014 पासून मोठा अपहार झाला होता. या अपहरात कर्मचाऱ्यांनीच अपहार केला असे म्हणत संस्थाचालक नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करत होते. परंतु काही ठेविदारांनी हा लढा लढत तत्कालीन चेअरमन वर देखील गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले होते.
संस्थापक संचालक यांनी आम्ही अपहार केला नाही आम्ही ठेवीदारांचे पैसे परत करणार नाही. असे म्हणत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत होते. करोडो रुपयांचा भ्रष्टाचार होऊन देखील चेअरमन व संचालक मंडळ जबाबदारी झटकत असल्याने ठेविदार संतप्त झाले व त्यांनी गांधीवादी मार्गाने या लढाईस सुरुवात केली. अनेकदा आमरण उपोषण करत ठेवीची मागणी केली परंतु कुणीही उत्स्फूर्त पणे चर्चेला आले नाही.
तालुक्यातील मोठ्या नेत्याचा हात डोक्यावर असल्याचे बोलत तुम्ही आमचे काही ही करु शकत नाही. असे बोलत ठेवीदारांना हिनवण्यात आले. अल्पसंख्याक समाजाच्या ठेविदारांना धमकवण्याचा प्रयत्न झाला. मात्र काही ठेविदारांनी ही लढाई कुणाच्या ही धमकीला न जुमानता लढली. आणि आज ही लढाई यशस्वीपणे जिंकली आहे. कुठल्याही धमकीला व राजकीय दबावाला न घाबरता या ठेवीदारांनी आपला लढा सुरू ठेवला.
ठेविदार भिमराज जाधव, विकास पवार, बबन सानप, गुणाजी उर्फ गुणवंत हजारे या मोजक्या ठेवीदारांनी जिकरीची लढाई शेवट पर्यंत लढली. या संचालक मंडळावर ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहक मंचाकडे तक्रारी दाखल केल्या. दोन्ही ही बाजू ऐकून घेत ग्राहक मंच अहमदनगर यांनी ठेविदारांच्या बाजूने निर्णय देत संचालक मंडळाला ठेविदारांच्या ठेवी व्याजासह एक महिन्याच्या आत देण्याचे आदेशीत केले आहे. त्याच बरोबर ठेविदारांना झालेला मानसिक त्रास बघता नुकसान भरपाई म्हणून दीड लाख रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
यावेळी ठेविदारांनी न्यायव्यवस्थेचे आभार मानले असून राजकीय हस्तक्षेपामुळे आमचे पैसे लटकले होते असा आरोप केला आहे. स्थानिक नेत्यांनी व एका मोठ्या नेत्यानी मोठी ताकद दिल्याने आम्हाला अतिशय त्रास झाला. पण न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास असल्याने आम्हाला एक दिवस न्याय मिळेल अशी खात्री होती.
साईबाबा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था बिरेवाडी या संस्थेचे तत्कालीन चेअरमन व संचालक मंडळावर न्यायालयाने जबाबदारी टाकली आहे. एक महिन्याच्या आत ठेविदारांच्या ठेवी अदा करण्याचा आदेश दिला आहे. परंतु या ठेवी अदा केल्या नाही तर कंटेम्पट ऑफ कोर्ट च्या नुसार कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल. ठेविदारांच्या वतीने ऍड. पाटोळे साहेब यांनी काम पाहिले. त्यांचे ठेविदारांनी मनस्वी अभिनंदन केले आहे.