संगमनेरच्या इसमांनी राहुरीच्या तरुणाला धारदार शस्त्राने केली मारहाण
राहुरी प्रतिनिधी/युन्नुस शेख: राहुरी फॅक्टरी परिसरातील गुरुकुल वसाहत येथील ३३ वर्षीय तरुणाला धारदार शस्त्राने मारहाण करून गंभीर जखमी केले. मारहाण करून पुन्हा संगमनेर येथे दिसला तर जिवे मारून टाकू, अशी धमकी दिल्याची घटना घडली आहे. जखमी सुशांत याच्यावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात संगमनेर येथील सहा ते सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुकुल वसाहत येथील सुशांत केदारी हे २६ सप्टेंबरला सायंकाळी वाणी मळा येथे जेवणासाठी जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या श्याम माणिक लोखंडे, यश श्याम लोखंडे (रा. संगमनेर) व इतर दोन ते पाच अनोळखी व्यक्तींनी सुशांत केदारी याच्या छातीवर, पोटावर व उजव्या हाताच्या दंडावर धारदार केदारी शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. यश लोखंडे याने आपल्या हातातील लाकडी दांड्याने मानेवर मारहाण केली.अनोळखी दोन ते पाच व्यक्तींनी शिवीगाळ करत मारहाण करून पुन्हा संगमनेर येथे दिसला तर जिवे मारून टाकू, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.