रवींद्र थोरात यांची भाजपा किसान मोर्चाच्या प्रदेश सचिव पदी निवड संगमनेर शहरात एकच जल्लोष
संगमनेर प्रतिनिधी :भारतीय जनता पार्टीचे नेते व स्वर्गीय संभाजी राजे थोरात फाउंडेशनचे संस्थापक रवींद्र संभाजीराजे थोरात यांची भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड होताच संगमनेर शहरात त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.. भारतीय जनता पक्षाचे नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे महसूल पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेशजी भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली व त्यांच्या मान्यतेने आज प्रदेश भाजपा किसान मोर्चा ची कार्यकारणी जाहीर झाली.
प्रदेश किसान मोर्चाचे प्रभारी व राज्य भाजपचे सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर व प्रभारी ज्ञानोबाजी मुंडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते व स्वर्गीय संभाजी राजे थोरात फाउंडेशन संगमनेर संस्थापक अध्यक्ष रवींद्र संभाजीराव थोरात यांची भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचा सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.