विश्वनेत्याच्या स्वागताची जय्यत तयारी करा-ना.विखे पाटील
पंतप्रधानमंत्री जिल्ह्यातील ८६ हजार लाभार्थीशी संवाद साधणार
संगमनेर दि.२० प्रतिनिधी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा नगर जिल्ह्याच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या दृष्टीने मोठी उपलब्धी ठरणार आहे. जिल्ह्यासह उतर महाराष्ट्रातील प्रकल्पांचे लोकार्पण त्यांच्या उपस्थितीत होत असून जिल्ह्यातील ८६ हजार लाभार्थीना योजनाचे वितरण या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात येत असल्याने प्रधानमंत्र्याचा ऐतिहासिक दौरा यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी करण्याचे आवाहन महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी येथील नियोजित दौर्याच्या नियोजनासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आश्वी खुर्द बुद्रूक जोर्वे आणि पिंपरणे येथे विविध गावांमधील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या आणि कार्यकर्माच्या नियोजनासाठी सूचना केल्या.
या कार्यक्रमात राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो किसान सन्मान योजनेचा प्रारंभही मोदीजींच्या हस्ते करण्यात येणार असून नगर येथील सुमारे २५ कोटी रुपये निधीतून उभारण्यात येणाऱ्या रूग्णालयाचे आणि शिर्डी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे भूमीपूजन होणार असून निळवंडे धरणाचे लोकार्पण संपन्न होणार असल्याचे सांगून ८० कोटी लोकांना मोफत धान्य देण्याच्या योजनेची जगाने आज दखल घेतली आहे.नगर जिल्ह्यात ४कोटी रुपयांच्या निधीतून जलजीवनच योजनेची काम सुरू असून संगमनेर तालुक्यात ७५० कोटी रूपये यासाठी उपलब्ध झाले असल्याचे विखे पाटील म्हणाले.
यापुर्वी शिर्डी येथे प्रधानमंत्री शिर्डी येथे आले होते.परंतू आताचे त्यांचे येणे विश्वनेत्याच्या रुपात आहेत.भारत देशाची प्रतिमा आज जगात महासतेच्या दिशेने वाटचाल करणारा देश म्हणून झाली आहे पाच ट्रीलीयन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचा टप्पा गाठताना देशातील सामान्य माणसाला योजनेच्या माध्यमातून विकास प्रकरीयेत आणण्याचे मोठे काम पंतप्रधानानी नऊ वर्षाच्या कार्यकाळात केले. सबका साथ सबका विकास हा मंत्र आज जगासाठी महत्वपूर्ण ठरला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.शिर्डी मतदार संघातील विकास प्रक्रीया केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पुढे जात आहे.जिरायती भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले निळवंडे धरणाचे काम युती सरकारमुळे मार्गी लागले.युवकांच्या रोजगारासाठी औद्योगिक वसाहतीची उभारणीचा निर्णय युवकांच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजनेचा तिसरा टप्पा सुरू केला.या योजनेतील लाभार्थीना कार्डचे वितरण तसेच महसूल विभागाच्या स्वामितव योजनेच्या प्रमाण पत्राचे वितरण या कार्यक्रमातून हैणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
पद्मश्री डॉ विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे, आण्णासाहेब भोसले, प्रवरा बँकेचे व्हा चेअरमन मच्छिंद्र थेटे, रामाभाऊ भुसाळ, सुदाम सानप, सौ.रोहीणी निघुते, गुलाबराव सांगळे, कांचनताई मांढरे, पोपटराव वाणी, शरद थोरात, सरपंच श्रीनाथ थोरात, सौ.प्रति दिघे, सौ.सविता शिंदे, श्रीमती भागीरथी काठे, राजेश सानप, राहूल दिघे, गोकुळ दिघे, शांताराम शिंदे, आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.