पारनेर प्रतिनिधी: घराच्या जागेवरुन सुरु असलेला वाद हा जीवावर बेतू शकतोे याची प्रचिती अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर मध्ये दिसून आली आहे. शेजारी शेजारी राहाणाऱ्या दोन कुटुंबात जागेवरुन वाद सुरु होता. हा वाद इतका विकोपाला गेला की या वादाचं रुपांतर हत्येत झालं.
आरोपीनं महिला आणि तीच्या अडीच वर्षांच्या मुलावर कार घालून या दोघांची हत्या केली. काल सायंकाळी 7 वाजता हा सगळा प्रकार घडलाय. याप्रकरणी किरण श्रीमंदिलकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. आरोपी सध्या फरार आहे.
याप्रकरणी मृत महिलेची सासू चंद्रकला यांनी फिर्याद केली आहे. शितल येनारे आणि स्वराज येनारे हे अहमदनरच्या पारनेर शहरातील कुंभार गल्लीमध्ये राहत होते. हल्लेखोर आरोपी श्रीमंदिलकर हा देखील त्यांच्या घराशेजारी राहत होता. घरा शेजारच्या जागेच्या मोजणीतून दोन्ही कुटुंबात वाद होता आणि त्यातूनच ही घटना घडली असल्याचा आरोप येणारे कुटुंबियाने केला आहे. गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पारनेर शहरातील कुंभार गल्लीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा हकनाहक बळी
याप्रकरणी मृत महिलेची सासू चंद्रकला येणारे यांच्या फिर्यादीवरून किरण श्रीमंदिलकर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. श्रीमंदिलकर आणि येनारे हे कुटुंब शेजारी शेजारी राहत होते. अनेक दिवसापासून जागेवरुन धुसफूस सुरूच होती. यातून अनेकदा वादावादीही झाली. भरधाव कार अंगावर घातल्याने महिलेसह तिच्या अडीच वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. माहिती मिळताच परिसरात बघ्यांची गर्दी वाढली होती.