इंडियन युथ आयकॉन पुरस्कार-२०२३ ने शिवश्री.राहुल ढेंबरे पाटील सन्मानित…
आग्रा(उत्तर प्रदेश): सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल रविवार दि.१७ डिसेंबर २०२३ रोजी आग्रा येथे नीती आयोग संलग्न जेबी इंडियाचा इंडियन युथ आयकॉन पुरस्कार २०२३ देशाचे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना.एस.पी.सिंग बघेल यांच्या हस्ते तसेच उत्तरप्रदेश भूमी विकास बँकेचे संचालक शाम बडोरिया यांचे प्रमुख उपस्थितीत सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक/ प्रदेशाध्यक्ष शिवश्री. राहुल बाजीराव ढेंबरे पाटील यांना सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी खेलकुद युवा महासंघ, भारत चे व्यवस्थापकीय संचालक डॉ.राहुल खरात, सिंघल ग्रुपचे अध्यक्ष सुशांत सिंघल, प्रसिद्ध शिवव्याख्याते, मराठे का हारले पानिपत- कादंबरीकार ह.भ.प.शिवाजी महाराज दाते आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम शिवश्री राहुल ढेंबरे पाटील करत आहेत.
गोमातेला राष्ट्रमाता घोषित करण्यात यावे व गोहत्या बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर सह्यांची मोहीम, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी-कष्टकऱ्यांचे झालेले नुकसान, विजेसंदर्भातील नविन विज कनेक्शन, सौर क्रुषी पंप योजना, ट्रांसफार्मर संदर्भातील अडीअडचणी शासन दरबारी मांडण्याचे काम, ग्रामीण भागातील बहुतांश गावातील नेटवर्क अडीअडचणी सोडविण्यात मोलाचे योगदान, छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर, समाज जनजागृतीसाठी व्याख्यानांचे आयोजन, वृक्षलागवड, विविध सामाजिक उपक्रम, छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीउत्सवानिमीत्त भव्य बालसंस्कार शिबिराचे आयोजन दरवर्षी केले जाते.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक/दळणवळण विषयक प्रश्नासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना, विविध शासकीय योजना, जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिबीरांचे आयोजन, ग्रामीण भागातील पाणी, रस्त्यांच्या प्रश्नासंदर्भात नेहमी अग्रेसर भूमिके बरोबरच जिल्हापरिषद, राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या विभागातील रस्त्यांच्या खड्डेमुक्तीसाठी वेगवेगळी आंदोलने, आमरण उपोषण, कोविड महामारीतही रुग्ण व नातेवाईकांना मदतीचा हात देण्याचे काम उत्कृष्ट पद्धतीने करत नातेवाईक आणि रुग्णांना आजारावर मात करण्यासाठी सामाजिक बांधीलकी जपत बळ देण्याचे काम, मराठा आरक्षण विषयी स्पष्ट आणि आग्रही भुमिका, जनसामान्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेण्याचे काम करण्याची पद्धती यामुळेच सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील शिवश्री राहुल ढेंबरे पाटील यांनी आपली आगळी-वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सामाजिक शिवकार्याच्या माध्यमातून राज्यस्तरीय आदर्श युवा समाजरत्न पुरस्कार २०२१, राज्यस्तरीय आदर्श समाजसेवक-२०२२, राज्यस्तरीय आदर्श जनसेवक-२०२३ या पुरस्कारांनी त्यांना यापूर्वी गौरविण्यात करण्यात आलेले आहे.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील हा युवातरुण सामाजिक शिवकार्य, शांत-संयमी, सामाजिक प्रश्नांची जाण असल्यामुळे थोरामोठ्यांच्या गळ्यातील ताईत बनला असुन तरूण पिढीसाठी एक आदर्श असाच आहे.