राहुरी प्रतिनिधी: एका भामट्याने फोन पे द्वारे राहुरी येथील इसमाची लाखों रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे . राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील विजय पठारे यांना विविध कारणे सांगून त्यांची वेळोवेळी फोन पे द्वारे सुमारे १ लाख २४ हजारांची फसवणूक करण्यात आली आहे.
ही घटना ७ नोव्हेंबर २०२३ रोजी घडली असून या घटने बाबत राहुरी पोलिस ठाण्यात भा द वी कलम ४२० नुसार गून्हा दाखल करण्यात आलाय. विजय भास्कर पठारे, वय ४९ वर्षे, हे राहुरी तालूक्यातील वांबोरी येथील ढवळे वस्ती येथील रहिवासी आहे. अहमदनगर येथील एम आय डी सी त एका कंपनीत मजुर म्हणुन काम करीत आहे. दि. ७ नोव्हेंबर २०२३ रोजी विजय पठारे यांनी पंजाब नॅशनल बँक सावेडी, अहमदनगर येथील ट्रमलोन कर्जाचा हप्ता एकुण १९ हजार ५०० रुपये हा फोन पे अकाउंटवर भरला. काही वेळाने त्यांनी त्यांच्या मोबाईल मधील ऍप व्दारे कर्जाचा हप्ताचे पैसे चेक केला असता ते जमा झाले नव्हते. त्यामुळे त्यांनी फोन पे ऍप वरुन पैसे जमा न झाल्याची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर त्यांनी पंजाब नॅशनल बँक येथे जावुन माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, सर्वर प्राब्लेम असल्याने पैसे नंतर जमा होईल, असे सांगितले.
दि. १० नोव्हेंबर २०२३ पर्यंत ट्रमलोनचे पैसे जमा न झाल्याने विजय पठारे यांनी मोबाईल वर गुगल क्रोम वरुन फोन पे कस्टमर मो. क्र. 06291365411 या सर्च करुन मिळावला.आणि त्यांच्या मोबाईलवरून त्या नंबरवर फोन केला सदर घटने बाबत तक्रार केली. काही वेळाने मो. क्र. 6290360424 यावरुन एका अनोळखी इसमाचा विजय पठारे यांना फोन आला. व त्याने हिंदी भाषेत बोलुन तक्रारी बाबत माहीती घेतली. काही वेळाने पून्हा फोन आला व विजय पठारे यांना म्हणाले की तुमचे पैसे परत पाहिजे असतील तर मोबाईल मध्ये avvaldesk remote desktop हे ऍप डाउनलोड करण्यास सांगितले. sarvbhoumत्या प्रमाणे विजय पठारे यांनी ऍप मोबाईलमध्ये डाउनलोड केले. त्यानंतर त्या इसमाने बँक अकाउटची माहिती घेवुन त्यामध्ये पैसे जमा झाले असतील असे बोलुन विश्वासात घेवुन डाउनलोड केलेल्या ऍपची माहीती घेवुन त्यावर क्लिक करायला लावले. त्यानंतर तुमचे पैसे यायला काही वेळ लागणार आहे. असे सांगून तुम्हाला आमच्या कंपनीचा युपीआय आयडी क्र. 9771783367@upi यावर ६२ हजार ९९८ रु. ऑनलाईन पाठवावे लागतील, त्यानंतर तुमचे पैसे परत मिळतील असे सांगीतले. विजय पठारे यांनी पैसे पाठवले. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी बोलबचन करुन विजय पठारे यांना पैसे पाठवण्यास सांगीतले.
विजय पठारे यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवुन वेळोवेळी एकूण १ लाख २४ हजार ४८० रुपये पाठवले. मात्र त्यांना त्यांचे पैसे परत मिळाले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विजय भास्कर पठारे रा. ढवळे वस्ती, वांबोरी, ता. राहुरी. यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून युपीआयआयडीक्र. 9771783367@upi, मोक्र. 06291365 यावरील अनोळखी व्यक्ती विरोधात गून्हा रजि. नं. १३८०/२०२३ भादंवि कलम ४२० तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ (ड) प्रमाणे फसवणूकीचा गून्हा दाखल करण्यात आला.