संगमनेर प्रतिनिधी/सहदेव जाधव
विना परवाना वाळुची वाहतूक करणा-या लहाणू भिमाजी खेमनर यांच्या ट्रॅक्टरवर संगमनेर तालुका पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, ट्रॅक्टर आणि सुमारे दिड ब्रास वाळूसह पोलिसांनी २ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर ट्रॅक्टर माजी महसूल मंत्र्यांच्या स्विय सहाय्यकाच्या कुटुंबातील असल्याचे या घटनेमुळे समोर आले असून, याची तालुक्यात जोरदार चर्चा सुरु आहे.
जोर्वे येथील माध्यमीक शाळेच्या कंपाऊट जवळ आज १६ फेब्रुवारी रोजी वाळूने भरलेला हा ट्रॅक्टर पोलिस कॉन्स्टेबल बाबासाहेब केशव शिरसाठ यांना आढळून आला. त्यानुसार ट्रॅक्टर क्रमाक एमएच १७ ए.व्ही ७०६५ या ट्रॅक्टर मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र फिर्यादीमध्ये ट्रॅक्टर मालकाचा कोणताही उल्लेख नव्हता. तालुका पोलिसांनी परिवहन विभागातून घेतलेल्या माहीती नंतर सदर ट्रॅक्टर लहानू भिमाजी खेमनर मु.पो. अंभोरे यांच्या नावावर असल्याचे उघड झाले.
तालुका पोलिसांनी सुमारे दिड लाख रुपये किमतीचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर, ५५ हजार रुपये किमतीची विना नंबरची ट्रॅक्टरच्या मागे असलेले डंपींग ट्रॉली आणि ट्रॉलीमध्ये असलेली सुमारे १५ हजार रुपये किमतीची अंदाजे दिड ब्रासवाळू असा एकुण २ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, पोलिस कॉन्स्टेबल बाबासाहेब शिरसाठ यांच्या फिर्यादीवरुन संगमनेर तालुका पोलिसांनी सदर ट्रॅक्टर मालका विरुध्द गुन्हा रजीस्ट्रर नंबर ६२/२ भादवी कलम ३७९ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस निरिक्षक देवीदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
पोलिसांनी ट्रॅक्टर पकडला असला तरी, फिर्यादीमध्ये ट्रॅक्टर मालकाच्या नावाचा उल्लेख नव्हता. मात्र पोलिसांनीच आरटीओ कार्यालयाकडून मिळविलेल्या माहिती नंतर सदर ट्रॅक्टर लहानू भिमाजी खेमनर मु.पो.अंभोरे ता.संगमनेर यांच्या नावावर असल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे माजी महसूल मंत्र्यांचे स्विय सहाय्यक यांच्या कुटूंबातील हे वाहन असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.