संपादकीय अग्रलेख/सहदेव जाधव
अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुजय विखे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्यात लढत झाली. तर शिर्डी येथून शिवसेना शिंदे गटाकडून सदाशिवराव लोखंडे आणि उ बा ठा चे भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात घासून लढत झाली. या अटीतटीच्या लढतीत निलेश लंके व भाऊसाहेब वाकचौरे यांनी विजय मिळवला असून सुजय विखें व लोखंडे यांचा निसटता पराभव झाला आहे. अहमदनगरमधून निलेश लंके 29317 मतांनी विजयी झाले आहे. तर वाकचौरे हे ५०५२९ मतांनी विजयी झाले.
भाजप उमेदवार सुजय विखे यांच्या मंचावरील अनेक नेत्यांनी देखील मला मदत केली, मात्र आता त्यांचं नाव घेणे योग्य ठरणार नाही असं म्हणत त्यांनी भाजप व महायुतीच्या गटात एकच खळबळ उडवून दिली. तर सदाशिवराव लोखंडे यांना फक्त अकोले व संगमनेर तालुक्यातील महायुतीच्या अंतर्गत वादामुळे पराभव पत्करावा लागला. अकोल्यातून किरण लहामटे यांची नाराजी काढण्यात लोखंडे अपयशी ठरले. वाकचौरे यांचा विजय तेथेच निश्चित झाला
सुजय विखेंच्या मंचावरील अनेक नेत्यांनी देखील मला मदत केली : निलेश लंके
दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके विजयाच्या जवळ आल्यानंतर त्यांनी मतमोजणी केंद्रात येऊन कार्यकर्त्यांबरोबर जल्लोष केला. हा विजय माझा नसून जनतेचा विजय आहे. भाजपच्या स्टेजवर उभे राहूनही मला मदत करणाऱ्या त्या सर्व अदृश्य शक्तीचाही हा विजय असल्याचं यावेळी त्यांनी सांगितले. सोबतच आता कुणाबद्दलही काहीही बोलायचे नाही असं निलेश लंके यांनी म्हटले आहे. परंतु भाजपमध्ये तिकीट मिळण्यापासून सुरू झालेली वादाची ठिणगी आगीत रुपांतरीत होईल असे वाटत नव्हते. परंतु अंतर्गत वादामुळे कर्जत जामखेड पाथर्डी येथून लंके यांना मिळालेली आघाडी ही लंकेच्या त्या वक्तव्याला पोषक ठरते.
उत्कर्षाताई रुपवते यांची बंडखोरीचा फायदा कुणाला?
उत्कर्षाताई रुपवते या वंचित बहुजन आघाडी कडून उभ्या राहिल्या. पण कमी दिवस मिळाल्याने प्रचाराला मिळालेला कमीत कमी वेळ यामुळे त्या पराभूत झाल्या. परंतु त्यांना मिळालेली मते ही विचार करायला लावणारी आहे. जवळपास एक लाख मते त्यांनी घेतली आहे. उत्कर्षाताई रुपवते यांनी सुशिक्षित मतदार आकर्षित केल्याचे बघायला मिळाले.
सदाशिवराव लोखंडे यांचा पराभव गद्दारांना डोक्यावर घेतल्याचा परिणाम.
अकोले तालुक्यात अनेक ठिकाणी बुथवरच गडबड झाली. जे बुथवर आहे त्यांच्या स्टेटसवर खासदार भाऊसाहेब वाकचौरे आज झळकत आहेत. अनेक गावांतून बुथ सशक्त नसल्याने एकतर्फी मतदान झाले. निष्ठावान कार्यकर्त्यांला बुथ जवळ फिरकू ही दिले नाही. संगमनेर तालुक्यातील पठार भागात मोठा राढा बघायला मिळाला पदाधिकारी बुथ प्रमुखांनाच विश्वासात न घेतल्याने येथे एक शिक्का मतदान घडून आले. गद्दारांना डोक्यावर घेतल्यानेच या दोन्ही ही उमेदवारांचा पराभव झाला हे निश्चित. लोखंडे व सुजय विखे पाटील यांचा पराभव कशामुळे झाला याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज दोन्ही ही उमेदवारांसह पक्षश्रेष्ठींना आहे.