राजसत्ता न्युज वृत्तसेवा:18 व्या लोकसभेसाठी आता मतदानाची प्रक्रिया सात टप्प्यात पूर्ण होऊन आता निकालाची घटिका समिप आली आहे. आता अवघ्या काही तासांनंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या मतदानासाठी यंदा जवळपास सात प्रदीर्घ टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पाडली गेली.
अहमदनगर लोकसभा व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतमोजणी प्रक्रिया पार पाडणार आहे. ही मतमोजणी नगर शहरातील एमआयडीसी परिसरातील महाराष्ट्र वखार महामंडळ येथे होणार आहे. दोन्ही मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी अनुक्रमे 450 आणि 415 इतक्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आठ वाजता पोस्टल मतमोजणी सुरुवात होणार असून, त्यानंतर अर्ध्या तासांनी ईव्हीएम मशीनच्या काउंटिंगला आपण सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी आपण मोबाईलला बंदी घालण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी सिद्धराम सालिमठ यांनी दिली आहे.
या परिसरात मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये तीन स्तरावर पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. पोलीस, सी. आर.पी.एफ व सीपीएफ असे तीन स्तरावरती पोलीस यंत्रणा सज्ज राहणार आहे. कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जाता येणार नाही. असंही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल आहे.
किती फेऱ्या होणार
नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. यावरती बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की आपल्या येथे कमीत कमी नगर शहरामध्ये 21 फेऱ्या ते जास्तीत जास्त 27 फेऱ्या पार पडतात. दोन मतदारसंघांमध्ये 365 मतदान केंद्र आहेत साधारण एका राऊंडला आपण अर्धा तास जरी पकडला रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत अंतिम निकाल हाती येण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दुपारपर्यंत निकाल स्पष्ट होऊ शकतो.
उद्या राजसत्ता न्युज चॅनलवर मतमोजणीचे सर्व अपडेट सुरू राहणार प्रत्येक क्षणाची बातमी आपल्या समोर घेऊन येणार आहोत त्यामुळे आताच राजसत्ता न्युज ची खालील लिंकवर जाऊन चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकाॅन क्लिक करा
https://youtube.com/@rajsattanews?si=6IZKt8DmMl9c7ykn