अंबादास दानवे आमदार झाल्यानंतरची सभागृहात घेतलेली शपथ विसरले
संपादकीय स्तंभलेखन: सहदेव जाधव
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केलेल्या एका विधानवरुन महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच चांगलंच रणकंदन सुरू झाले. हा वाद एवढा पेटला की, विधानपऱिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी भर् सभागृहात भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ सुरू केली. तदनंतर विधानपरिषदेत प्रचंड गदारोळ सुरू झाला.
राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी विधानपरिषदेत भाजपच्या वतीने करण्यात आली होती. त्यानंतर याच मुद्द्यावर बोलताना अंबादास दानवे हे बोलण्यासाठी उभे राहिल्यावर प्रसाद लाड यांनी त्यांच्या दिशेने काही हातवारे केले. तदनंतर दानवेंचा पारा हा चांगलाच चढला आणि त्यांनी थेट अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे असंविधानीक वक्तव्य
राहुल गांधी यांच्या निषेधाचा ठराव विधानपरिषदेत करण्यात यावा अशी मागणी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केली. ज्यावर बोलण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे उभे राहिले. अतिशय निंदनीय आणि महाराष्ट्राची संस्कृतीस अशोभनीय असं कृत्य दानवे यांनी केले. एका संविधानीक पदावर असताना दानवेंनी आई बहिणींवरुन केलेली शिवराळ भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी आहे.
यावेळी अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले बघा ..आणि समजून घ्या या व्यक्तीचे संस्कार काय आहेत. सभापती महोदय, माझा मुद्दा हा आहे की, जे काही वक्तव्य ज्याचं असेल त्याचं लोकसभेत झालेलं आहे. त्याचा संबंध आपल्या कामकाजाशी येतो का? हा माझा प्रश्न आहे. मला असं वाटतं.. हिंदुत्वाचा मुद्दा मांडणारे हे आपल्या सभागृहामध्ये…’ ‘ये तू हात नाही करायचा.. माझ्याकडे हात नाही करायचा.. तिकडे करायचा.. तिकडे करायचा.. भ@&# तिकडे करायचा.. मा$&@#’ या त्या शिवराळ भाषा. एखाद्या टपोरीलाही चार चौघात या शिव्या देताना लाज वाटेल, पण अंबादास दानवे या व्यक्तीने सभागृहाचे पावित्र्य भंग केले आहे. दानवे यांनी केवळ विरोधीपक्ष नेता पदाचा राजिनामा नव्हे तर सभागृहातून कायमस्वरूपी निलंबित करणं गरजेचे आहे. तर बाकी सदस्यांवर अंकुश राहील व सभागृहातील पावित्र्य राखले जाईल.
अंबादास दानवे यांचा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनाम्याची मागणी
या संपूर्ण घटनेनंतर सभागृह उपसभापती निलम गोऱ्हे यांनी तहकूब केले. पण त्यानंतर प्रसाद लाड हे अत्यंत संतप्त व आक्रमक झालेले दिसून आले. विऱोधी पक्षनेते दानवेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणीच त्यांनी यावेळी केली. तसंच राजीनामा होणार नाही तोवर सभागृह चालू देणार नाही असा गर्भित इशाराही त्यांनी यावेळी दिला. दुसरीकडे अंबादास दानवे यांनी देखील सभागृहातून बाहेर येताच पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी ते म्हणाले की… ‘माझा काही तोल सुटलेला नाही. मी शिवसेनाप्रमुखांच्या विचाराचा कट्टर शिवसैनिक आहे. माझ्यावर कोणी बोट उचललं तर त्याचं बोट तोडायची ताकद माझ्या मनगटात आहे. त्यामुळे माझा कोणताही तोल सुटलेला नाही. जो या विषयाशी संबंधित सभागृहाचा विषय नव्हता.. सभापतींना बोललं पाहिजे.. माझ्याकडे बोट दाखवून, हातवारे करून समोरच्या सदस्याला बोलायचा अधिकार नाही.’ ‘त्यामुळे मी आमदार, विरोधी पक्ष नेता… हे सगळं नंतर मी सगळ्यात आधी शिवसैनिक आहे. मला असं वाटतं की, जो राष्ट्रवादी, वैगरे यांचे जे विचार होते आता भाजपमध्ये जुम्मा.. जुम्मा चार दिवस आलेला माणूस मला हिंदुत्व शिकवणार का?”माझ्यावर ७५ केसेस आहेत. सगळ्या दंगलीच्या केसेस आहेत, सगळ्या प्रकारच्या केसेस माझ्यावर आहेत. ४-४ वेळेस तडीपार झालेला शिवसैनिक आहे मी. मला हिंदुत्व शिकवणार प्रसाद लाड सारखा बाटगा.. नुस्ता धंदा करणारा पक्षाचा विचार घेऊन.. तो मला हिंदुत्व शिकवणार का? ”मला भाषण करायचं होतं सभागृहात.. त्यामुळे मी माझे मुद्दे याचा अभ्यास करत होतो. परंतु भाजप वेगवेगळ्या विषयावर गोंधळ घालत असताना विरोधी पक्ष नेता म्हणून मला त्यावर बोलण्याचा अधिकार आहे. म्हणून मी एवढाच प्रश्न सभापतींना केला की, हा विषय आपल्या सभागृहाशी संबंधित आहे का?’ ‘आहे.. नाही.. हे उत्तर देणं सभापतींचं काम आहे. त्यामुळे त्यांनी जे उत्तर दिलं असतं तर त्याचा जबाब ते सभापतीकडे मागू शकत होते. मला बोलायचं काही कारणच नव्हतं. त्यामुळे मी माझ्या जागेपासून बाजूला सारल्यापासून मी शिवसैनिक म्हणून माझा अवतार धारण केला हे सत्य आहे.
माझ्याकडे हातवारे करायची गरजच नव्हती. मला काहीही पश्चाताप होत नाही.. मी जे बोललो.. बोललो.. तो कोण माझा राजीनामा मागणारा.. माझ्या पक्षाचे नेते बघतील.’ ‘हे बघा जिथे हिंसेची गरज आहे तिथे हिंदू हिंसक होतो. मी तुम्हाला सांगतोय की, माझ्यावरही काही केसेस आहेत. हिंदुत्वासाठी आहेत.. त्याचा मला काहीही पश्चाताप नाही. पण हे सगळे बोलणारे डुप्लिकेट आहेत. भाजप म्हणजे काय हिंदुत्व आहे का? हे शेपट्या टाकून पळणारे भाजपचे लोकं आम्हाला हिंदुत्व शिकवणार का?’ अशा पद्धतीने पत्रकारांशी बोलताना दानवेंनी संवाद साधला.
पत्रकारांशी संवाद साधताना देखील दानवेनी आपला हेका कायम ठेवत विरोधी पक्षनेते पदास दुय्यम स्थान दिलेलं दिसून आले. तसेच माझ्यावर ७५ केसेस आहे, मी चार वेळेस तडीपार झालेलो आहे हे सांगत कायद्याला देखील जुमानत नसल्याचे अधोरेखित केले. त्याच बरोबर आपली गुन्हेगारीचा सर्व इतिहास त्यांनी त्यांच्याच भाषेत माध्यमांसमोर सांगितला. अंबादास दानवे यांनी आमदार झाल्यानंतर सभागृहात घेतलेली शपथ विसरलेत का असा प्रश्न देखील आता पडत आहे. संविधान बचाव म्हणणारे संविधानाचा अपमान करत आहेत हे सिद्ध झाले. अंबादास दानवे यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.