नाशिक प्रतिनिधी : विधान परिषदेसाठी नुकत्याच पार पडलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या किशोर दराडे यांचा दणदणीत विजय झाला आहे. मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीत शिवसेनेचे किशोर दराडे, महायुतीचे संदीप गुळवे आणि अपक्ष उमेदवरा विवेक कोल्हे यांच्यात जोरदार लढत पहायला मिळाली पण अखेर दराडे यांनी विजय मिळवला.
नाशिक शिक्षक मतदार संघात विवेक कोल्हे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता. काॅंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची साथ लाभेल अशी अपेक्षा गृहीत धरून कोल्हे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु याचाच फायदा महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांना झाला आहे. आणि त्यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.