संगमनेर दि. ६, प्रतिनिधी
राज्य सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या संजय गांधी निराधार योजना अंतर्गत तालुक्यातील लाभार्थ्यांना जुन २०२४ अखेर २ कोटी ४८ लाख ४ हजार ८०० रुपयांचे अनुदान महसूल तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले असल्याची माहिती संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष अमोल खताळ पाटील यांनी दिली.
संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण५२४० लाभार्थ्याना ७७ लाख ७६ हजार ६०० रुपये, माहे जुन २०२४ चे संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जाती ५६२ लाभार्थ्याना ८ लाख ३५ हजार २०० रुपये, माहे एप्रिल मे आणि जून २०२४ चे संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जमाती २२६ लाभार्थ्यांना १० लाख ८ हजार रुपये, माहे जून २०२४ चे श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना सर्वसाधारण ५३११ लाभार्थ्यांना ७९ लाख ६६ हजार ५०० रुपये, माहे जून २०२४ चे श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अनुसूचित जाती ६९५ लाभार्थ्यांना १० लाख ४२ हजार ५०० रुपये, माहे एप्रिल आणि मे २०२४ चे श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अनुसूचित जमाती ३२४ लाभार्थ्यांना ९ लाख ७२००० हजार रुपये, माहे जून २०२४ चे श्रावणबाळ गट अ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना ४०२८ लाभार्थ्यांना ५२ लाख ४ हजार रुपये मात्र अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खातेवर आज वर्ग करणेत आले आह.तसेच संजय गांधी निराधार योजना समितीची बैठकलवकर घेणार असून कागदपत्रे परिपूर्णअसणाऱ्यांनी जमा करावीत तसेच ज्या महिलासंजय गांधी निराधार योजनेमध्ये नियम, अटी पूर्णकरू न शकल्या नाही त्यांची प्रकरणे नामंजूरझालेली असून त्यांनी मुख्यमंत्री- लाडकी बहिणयोजनेमध्ये लाभ घ्यावा असे आव्हान अमोल खताळ यांनी केले आहे.
तालुक्यात संजय गांधी निराधार योजना मेळावे गावागावात सुरु होणार असल्यामुळे नागरिकांनी कुठल्याही एजंटला कागदपत्रे, पैसे देऊ नये. महायुती सरकारतर्फे योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचविण्याचा आमचा संकल्प असून, त्यासाठी जास्तीत जास्त लाभार्थी यांनी याचा लाभ घ्यावा. प्रकरणे नियमानुसारच मंजूर होणार असल्यामुळे फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच लाभार्थी म्हणून मानधन मिळण्यास काही अडचण येत असल्यास माझ्या संपर्क कार्यालयात अथवा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालय, भाजप कार्यालय संगमनेर येथे संपर्क साधावा असे आव्हान अमोल खताळ पाटील यांनी केले आहे.