संगमनेर (प्रतिनिधी)- तालुक्यातील लाभार्थ्यांना यापूर्वी प्रकरणे करण्यासाठी होणारा त्रास, दलालांपासून मुक्ती, दरमहा खात्यावर पैसे जमा, सन्मानजनक वागणूक, अडचणी येणाऱ्याच्या पाठीशी उभे राहिल्यामुळे आज लोकांची ओढ अमोल खताळ यांच्याकडे वाढली आहे. भाजपा व समितीचे काम उत्कृष्ट सुरू असल्यामुळे यशोधनला जाणाऱ्यांची संख्या घटल्यामुळे काही नेते व्यथित झालेले आहे.
पालकमंत्री विखे साहेब यांनी दि. १० मार्च २०२४ रोजी मा. जिल्हाधिकारी यांना संजय गांधी निराधार योजना समिती अशासकीय सदस्य नियुक्ती बाबत शिफारस केली होती. परंतु लोकसभा, शिक्षक विधानपरिषद निवडणुक आचारसंहिता सुरु झाल्याने समिती नियुक्ती प्रलंबित राहिली होती. आचार संहिता संपल्यानंतर समिती अध्यक्ष अमोल खताळ यांनी जिल्हाधिकारी साहेब यांना भेटून समिती तत्काळ जाहीर करण्याची विनंती केली केली असता मा.जिल्हाधिकारी साहेब यांनी दिनांक ११ जुलै रोजी समिती नियुक्ती जाहीर केली. अशासकीय सदस्य नियुक्ती आदेश झाल्यानंतर अध्यक्ष खताळ यांनी तहसिलदार यांच्याशी चर्चा करून १३ जुलै रोजीच पत्र काढून बैठक १८ जुलै रोजी सकाळी ११.०० वाजता तहसिल कार्यालयात घेण्याचे ठरविले होते. अध्यक्ष, समिती सर्व सदस्य, तहसिलदार बैठक सुरु झाल्यानंतर आमदाराची मुलगी निवेदन देण्यासाठी तहसिल कार्यालयात आली असता बैठक सुरु असल्याने तहसिलदार यांनी नायब तहसिलदार यांना निवेदन स्वीकराणेसाठी सांगितले. परंतु निवेदन हे तहसिलदार यांनीच स्वीकारावे असा हट्ट आमदार मुलीनी धरला, अर्धा तास थांबावे लागल्याचे दुख झाल्याच्या नैराश्यातून आमदाराच्या भावाने पत्रक काढून प्रशासकीय दिरंगाईच्या नावाखाली राजकीय संधी साधण्याचा केविलवाणा प्रयत्न केला व बैठक आमच्यामुळेच झाली असा भासविण्याचा प्रराक्रम केला.
महायुती व पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनाचे काम लोकाभिमुख, पारदर्शी सुरू असून माझी नियुक्ती झाल्यापासून नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार योजनेचे प्रकरण मंजूर करताना राजकीय निकष न लावता शोषित, पिडीत, वंचित घटकांना न्याय देण्याचे काम आम्ही करत आहे. स्थानिक आमदार मंत्रीं असताना त्यांच्या कालावधीमध्ये सहा सहा महिने लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होत नव्हते. नामदार विखे पाटील यांच्यामुळे दरमहा पाच तारखेच्या आत प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यावर पैसे जमा होत असल्याने ग्रामीण भागात समाधानाचे वातावरण असते.
लाभार्थी यांना महसूलमंत्री तथा पालकमंत्री नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मंजुरी आदेश देणार असल्यामुळे, राजकीय लाभ आपल्याला घेता येणार नसल्याचे दुःख जनतेच्या नजरेपासून लपून राहिलेले नाही व्यथित झालेल्यांच्या पत्रकातून हे सिद्ध झाले आहे.