अहमदनगर मधील अकोले शहरातून एक मोठी बातमी आली आहे. राजेंद्र रघुनाथ सूर्यवंशी यांनी आपल्या व्यापारी गाळ्यात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी घडली.राजेंद्र सूर्यवंशी हे सुतारकाम व्यावसायिक होते. दरम्यान या प्रकरणी एका प्रतिष्ठित व्यक्तीविरुद्ध अकोले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूर्यवंशी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून, ती पोलिसांकडे असल्याचे समजते. त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत शिवसेना (शिंदेगट) शहर प्रमुख गणेश कानवडे यांचे नाव आहे. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्यावर अत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय.
अमोल राजेंद्र सूर्यवंशी (रा. अकोले) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे, फिर्यादीचे वडील मयत राजेंद्र रघुनाथ सूर्यवंशी यांना गणेश भागुजी कानवडे यांनी वेळोवेळी जिवे मारण्याची धमकी, शिवीगाळ करून मानसिक त्रास दिला.
त्यामुळे फिर्यादीच्या वडिलांनी रविवारी (दि. १५) सकाळी ८.३० वाजण्याच्या पूर्वी आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवून राहत्या घराच्या गाळ्यात नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.